पुणे हादरलं! भररस्त्यावर तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, घटनेचा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?

पुणे : देशभरात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरु असून सर्वत्र देवीचा जागर केला जातोय. तर अनेक ठिकाणी कर्तृत्वान महिलांचा सत्कार आणि सन्मान सोहळे सुरू आहेत. मात्र असं असताना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात मात्र वेगळंच आणि तितकंच संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे.

एका किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला भर रस्त्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. दानवाप्रमाणे एका तरुणाने त्या तरुणीवर हल्ला चढवला. परिसरातील नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला.
ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर जाणाऱ्या मार्गावर घडली. आता ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली, मारहाण करणारा तरुण संबंधित तरुणीचा कोण आहे? याबद्दल कुठली ही माहिती मिळू शकलेली नाही.

मात्र, रात्री उशिरापर्यंत कुठली ही तक्रार प्राप्त न झाल्याची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस यांनी दिली. असं असलं तरी सुद्धा या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
