पुण्यातील तरूणीला पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट करणं पडलं महागात, तरुणीवर मोठी कारवाई, कायमची अद्दलच घडली..

पुणे : सध्या भारत-पाकिस्तानमधील वातावरण तापले आहे. पाकिस्तानने केलेल्या कुरापतीनंतर भारताने जोरदार उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार एअरस्ट्राईक केला. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. नंतर अजूनही कारवार सुरु आहे.
असे असताना पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याचा आणि पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा लिहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित तरुणीला अटक करण्यात आली आहे,
ज्या महाविद्यालयात ती शिकत होती, त्या संस्थेनेही तिच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत सकल हिंदू समाज या संघटनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पुणे शहर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत तरुणीला ताब्यात घेतले. याबाबत तपास सुरू आहे.
तरुणीने पाकिस्तानचे समर्थन करणारा पाकिस्तान जिंदाबाद लिहिलेला मेसेज एका व्हॉट्सॲप ग्रुपवरही टाकला होता. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना भारताने घेतलेल्या भूमिकेबद्दल आक्षेपार्ह मजकूर तिने पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये दिसून आले आहे. पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर याबाबत तपास करत आहेत.
दरम्यान, पुण्यात शिक्षण घेत असलेल्या या तरुणीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर पाकिस्तानच्या बाजूने आणि पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा लिहिल्या होत्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि तक्रार दाखल झाल्यानंतर, तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात आल्याची माहिती आहे.