वर्षभराच्या संसाराचा दुर्दैवी शेवट! पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या..


नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून 27 वर्षीय अनिकेत बाळासाहेब जगताप यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत आणि श्रुती यांचा विवाह सुमारे वर्षभरापूर्वी झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने श्रुती माहेरी राहू लागली होती. तसेच तिने अनिकेतविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. या सर्व प्रकारामुळे अनिकेत गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नी श्रुती, सासू वंदना धिवरे, सासरे सुभाष धिवरे आणि मामे सासू यांनी अनिकेतचा मानसिक छळ केला. या तक्रारीच्या आधारे कॅम्प पोलिसांनी संबंधित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, कुटुंबीयांच्या लेखी तक्रारीनंतर पुढील कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनिकेतच्या कुटुंबीयांनी केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!