दौंडमध्ये भयंकर प्रकार आला समोर!! नराधमाने मुलीला दुकानासमोर उचलून ऊसाच्या शेतात नेलं अन्…

दौंड : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दौंड तालुक्यात साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी येथील नवनाथ चंद्रकांत रिठे या (वय.२७) व्यक्तीच्या विरोधात दौंड पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीला दौंड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल शक्रवारी (ता.१६) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची साडेपाच वर्षांची मुलगी ही पुणे-सोलापूर महामार्गावरील भागवत वस्ती येथील किराणा दुकानासमोर उभी असताना आरोपीने तिचे अपहरण केलं.

त्यानंतर तिला दौंड तालुक्यातील मळद गावच्या परिसरातील ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडितेच्या अंगावरील कपडे काढून मारहाण केली, तसेच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
कुरकुंभ मधील भागवतवस्ती मधील किराणा दुकानासमोरून आरोपीने पीडित साडे पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून त्या मुलीला मळदमधील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.
स्थानिकांनी मुलीचा आरडा-ओरड करत असलेला आवाज ऐकल्याने घटनास्थळी जाऊन भयानक प्रकार उघडकीस आला. २७ वर्षीय नवनाथ रिठे असे नराधम आरोपीचे नाव असून दौंड पोलिसांनी या नराधमाला अटक करण्यात आली आहे.