धक्कादायक घटनेने दौंड हादरलं! शिक्षक पत्नीचा खून, दोन मुलांना विहिरीत ढकललं आणि डॉक्टरने स्वतःलाही संपवल..


दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वरवंड येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला.

तसेच दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन आत्महत्या करुन कुटुंबच संपवले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

डॉ. अतुल शिवाजी दिवेकर ( वय ४२) पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९), अदिवत अतुल दिवेकर ( वय ९) वेदांती अतुल दिवेकर (वय ६) अशी यांची नावे आहेत. डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

डॉ. दिवेकर यांनी प्रथम पत्नीचा खून केला. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ते घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातील विहित नेऊन टाकली आणि घरी जाऊन आत्महत्या केली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

त्यापुर्वी त्याने चिठ्ठी लिहिल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटस आणि यवत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन लहान मुले अद्याप सापडली नाहीत. त्यांचा शोध पोलीस विहिरीचे पाणी काढून करत आहेत.

ही घटना कशामुळे झाली याबाबत अद्याप कारण समोर आलं नाही पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे मात्र पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!