महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!! लॉजमध्ये एकटी होती महिला, राष्ट्रवादीचा नेता जबरदस्तीने आत घुसला अन्….


सोलापूर : पुण्यात भाजपच्या एका नेत्याने पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग केला होता. ही घटना ताजी असताना राजकीय वर्तुळाला हादरवणारी दुसरी घटना उघडकीस आली आहे. सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका नेत्याने लॉजच्या रुममध्ये घुसून एका महिलेवर अत्याचार केला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेनं फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मनोहर सपाटे असं गुन्हा दाखल झालेल्या शरद पवार गटाच्या नेत्याचं नाव आहे. तो सोलापूरचा माजी महापौर देखील राहिला आहे. तो सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्य देखील आहे.

मनोहर सपाटे याच्याविरुद्ध एका ४५ वर्षीय विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत विनयभंग केला. तसेच दमदाटी केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पुणे येथे राहतात. त्या मूळच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील आहेत. गावातील शेतीच्या वादामुळे कोर्ट केस सुरू आहे. त्यासाठी त्या सोलापुरात वकिलांना भेटण्यासाठी येत असतात.

तसेच १४ जूनला त्या माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये राहिल्या होत्या. सुरुवातीचे दोन दिवस त्यांचं वास्तव्य रूम नंबर २०२ तर पुढील दोन दिवस त्या रूम नंबर २०५ मध्ये राहिल्या. १६ जूनच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास मनोहर सपाटे याने रूमचा दरवाजा ठोठावून महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, त्यांच्याशी अश्लील हावभाव करीत विनयभंग केला. पीडित महिलेनं घाबरून ‘तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, असे का करता?’ असं विचारलं. तेव्हा आरोपीनं अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तू कुठेही तक्रार केली, तरीही मला काही फरक पडत नाही. कारण माझे वय जास्त असल्यामुळे मला लगेच जामीन मिळतो, असे सांगत दमदाटी केली.

त्यानंतर आरोपीनं वारंवार मोबाईलवरून संपर्क करत पीडितेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला. त्यानंतर पीडित महिला २४ जूनला अ‍ॅड. योगेश पवार यांचा सल्ला घेण्यासाठी सोलापुरात आल्या होत्या. त्याचवेळी पीडितेला सपाटेचा फोन आला. त्याने लॉजवरील रूम नंबर ३०७ वर येण्याचा आग्रह केला. त्यावेळी पीडितेनं स्टिंग ऑपरेशन करण्याचं ठरवलं.२४ जूनला संध्याकाळी पीडितेनं रूम नं. ३०७ मध्ये जाऊन सपाटेंच्या कृत्याचे व्हिडीओ काढले.

त्या व्हिडीओत सपाटे हा पीडितेसोबत अश्लील कृत्य करताना दिसून येत आहे. या व्हिडीओतील पुराव्याच्या आधारे महिलेनं 25 जूनला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!