धक्कादायक! गृहपाठ न केल्याने शाळेच्या संचालकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; विद्यार्थ्याचा मृत्यू…!

सहरसा : बिहारमधील सहरसा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे . सात वर्षांच्या मुलाला शाळेच्या संचालकाने गृहपाठ न केल्यामुळे बेदम मारहाण केली ,ही मारहाण इतकी बेदम होती की यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.
याचदरम्यान , ज्या हॉस्पिटलमध्ये या मुलाचा मृत्यू झाला तेथील डॉक्टरांनी सांगितले की, मुलाच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजेल. हे प्रकरण जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर पोलिस ठाण्याच्या हुसेनचक भागातील आहे. या शाळेतील आदित्य या सात वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Views:
[jp_post_view]