कुंजीरवाडीत प्रतिष्ठित मान्यवराने स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून जीवन संपविले! घटनेने परिसरात उडाली खळबळ…

उरुळी कांचन : आजाराला कंटाळून एका शेतकऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील धुमाळ मळा परिसरातील कुंजीरवस्तीवर घडली असून शुक्रवारी (ता.21) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाळासाहेब निवृत्ती कुंजीर (वय – 61, रा.कुंजीरवाडी, ता.हवेली) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब कुंजीर हे एक शेतकरी असून कुटुंबासोबत कुंजीरवाडी परिसरात राहतात. कुंजीर यांना मधुमेहाचा त्रास होता. तसेच त्यांना मागील चार वर्षापूर्वी कोरोनाची लागण झाली होते. त्यावेळी औषधोपचार दरम्यान डोळ्याला इजा झाल्याने त्यांना एका डोळ्यातून दिसत नव्हते. त्यामुळे ते घरातच बेडरेस्ट घेत होते.
दरम्यान, कुंजीर यांच्या नातेवाईकांचा शुक्रवारी कार्यक्रम होत. त्यामुळे घरातील सर्व सदस्य कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा कुंजीर घरात एकटेच होते. संध्याकाळी घरातील मंडळी घरी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरी आली होते. तेव्हा बाळासाहेब कुंजीर यांच्या मुलाला वडील कुंजीर यांनी स्वतःवर गोळीबार केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर कुंजीर यांच्या मुलाने याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, रत्नदीप बिराजदार, अमोल घोडके, पोलिस हवालदार विजय जाधव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी कुंजीर ला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कुंजीर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले आहे.
कुंजीर यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल. कुंजीर यांनी स्वतःवर गोळीबार केलेल्या बंदूक ही त्यांच्याच नावावर असून तिला शासकीय परवाना आहे. तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.