कतरिना-विकीच्या घरी येणार नवा पाहुणा; क्युट फोटो शेअर करीत दिली गुडन्यूज…


मुंबई : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे . त्यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. बेबी बंपसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोट टाकत कतरिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही बातमी शेअर केली आहे.

अवघ्या काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या गुड न्यूजवर काही क्षणांतच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या आयुष्यात गोड बातमी आहे की नाही, या चर्चेने जोर धरला होता. मात्र, आज विकी आणि कतरिना यांनी स्वतः चाहत्यांसोबत ही खुशखबर शेअर करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी कतरिनाचा बेबी बंप दिसणारा फोटो शेअर केला आहे. हा एक पोलॅरॉइड फोटो असून त्यात विकी कतरिनाच्या बंप वर हात ठेवून पोज देताना दिसत आहे, हे दृश्य त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत गोड आणि आनंददायक ठरले आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी या खास क्षणासाठी एक सुंदर कॅप्शन दिलं आहे, ज्यात त्यांनी लिहिलं आहे की, आमचं मन आनंदी आणि कृतज्ञतेने भरलं आहे. या आनंदी अंतः करणासह आम्ही आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करतोय. या पोस्टवर लाईक आणि कमेंट्स चा वर्षाव करत चाहते या दोघांच्या आनंदात सहभागी झाले आहेत.

याआधीही, अलिबागला जाताना विकी-कतरिनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात कतरिनाचा बेबी बंप दिसून आला होता. त्यानंतर या गुड न्यूज ची अपेक्षा चाहत्यांमध्ये अजूनच वाढली होती. पण याबाबत या दोघांनीही काही स्पष्टीकरण दिलं नव्हतं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!