भाजपचा राहुल कुल यांच्या नावाने जोडला जाऊ लागला आहे नवा आध्याय! राज्यातील काँग्रेसचे गांधी घराण्यातील नेते कुल यांच्या शिष्टाईने भाजपात…

जयदिप जाधव उरुळी कांचन : राज्यात शत प्रतिक्षत: भाजप या ब्रीजवाक्यावर राज्यात स्वबळावर सत्तेकडे कूच करणाऱ्या भाजपकडे पक्षप्रवेक्षाची रीघ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नेतृत्वा वर विश्वास ठेऊन राज्यातील बडी विरोधी मंडळी भाजपचा रस्ता धरु लागली आहे. अशातच पुणे जिल्ह्यात तसेच राज्यात बड्या चेहऱ्यांना भाजपची कास धरायला लावणारी मुख्य भूमिका दौंडचे आमदार राहुल कुल हे निभावत आहे.पुणे जिल्ह्यात भाजपचा वारू राहुल कुल यांच्यामुळे उधळू लागल्याने ग्रामीण भागात भाजपला नवा आध्याय जोडला जाऊ लागला आहे.
राज्यात २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर पक्षाची पूर्णतः हा सुत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहे. सत्तेच्या माध्यमातून सहकार, कृषी, सामान्य प्रशासन या प्रश्नांची उत्तम जाण व अभ्यासू नेतृत्व चुणूक म्हणून राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जात आहे. गेली साडे सात वर्षे सत्तेत राहून त्यांनी पक्षसंघटनेकडे तितकेच लक्ष पुरविले आहे. त्यांच्याकडे अडीच वर्षात सत्ता नसतानाही विधानपरिषद असो की राज्यसभा निवडणूकीत त्यांनी अपक्षांना आपल्याकडे वळविण्यासह राज्यात महत्त्वाचे सत्तांतर घडविण्यास मोठे सामर्थ्य दाखविले आहे. आता मात्र त्यांच्या नेतृत्वाला उभारी देण्यासाठी त्यांचे जवळचे सहकारी आ. राहुल कुल यांची रणनीती कामी पडू लागली आहे.
अलिकडेच पुणे जिल्ह्यात गांधी घराण्यातील एकनिष्ठ असलेल्या माजी आमदार संग्राम थोपटे, दुसरे गांधी घराण्यातील जवळचे धुळ ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रवेशाची मूहूर्तमेढ आ. राहुल कुल यांच्या शिष्टाईनेच रचली गेली आहे. तर सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रविण माणे यांच्या भाजप प्रवेशाचे सोपस्कार राहुल कुल यांच्या प्रवेशाने पूर्ण झाले आहे. राज्यात कुल यांच्याकडे फडणवीस यांनी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्षपद देताना सामान्य प्रशासन असो की जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांसाठी अभ्यासूपुर्ण प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी विशेषतः जबाबदारी दिल्याने या जबाबदारीतून त्यांनी आता थेट भाजपला बलस्थानी आणण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू केले आहेत.
मागील विधान परिषद, राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल कुल यांनी भाजपच्या यशासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख पडद्यामागील रणनीतीकार म्हणून आला होता. आता थेट त्यांनी जिल्ह्यातील उत्तर , दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीसह बडे मोहोरे भाजपकडे वळविण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याने भाजपला पश्चिम महाराष्ट्र विस्तारात राहुल कुल यांना महत्त्वाचे स्थान मिळणार आहे.