मध्यरात्री मुस्लिम तांत्रिकाने १७ वर्षाच्या मुलीला बोलावलं, त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेश : गुन्हेगारीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुस्लिम तांत्रिक १७ वर्षाच्या मुलीला घेऊन फरार झाला आहे. तो सहा मुलांचा पिता आहे. गावात या बद्दल समजताच एकच संतापाची लाट उसळली आहे.
पोलीस आरोपी तांत्रिकाचा शोध घेत आहेत. या तांत्रिकावर आधीपासून अनेक गुन्ह्यांची नोंद आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. शनिवार भाजपा नेते प्रताप सिंह काही गावकऱ्यांना घेऊन एसपी कार्यालयात आले.
त्यांनी ४५ वर्षीय तांत्रिकाविरोधात १७ वर्षीच्या मुलीच अपहरण केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली. २४ तासांच्या आत मुलीचा शोध लागला पाहिजे, असे भाजप नेत्याने पोलिसांना अल्टीमेटम दिला आहे. पोलीस सध्या हा तांत्रिक आणि मुलीचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील किठौर क्षेत्रातील हे प्रकरण आहे.
भाजप नेत्याने आरोप केलाय की, गुरुवारी रात्री गावात राहणारा दुसऱ्या समुदायाचा तांत्रिक १७ वर्षाच्या मुलीला घेऊन फरार झाला. त्याने तंत्र-मंत्राच्या बहाण्याने मुलीला बोलावलं. यात गंभीर बाब म्हणजे मुलीने घरातून निघताना स्वत:सोबत लाखो रुपये कॅश आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली.
ग्रामस्थांनी सांगितलं की, ४५ वर्षीय तांत्रिक सहा मुलांचा बाप आहे. तो याआधी सुद्धा अनेक गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आला आहे. त्यांनी हे प्रकरण दोन पक्षांशी संबंधित असल्याच सांगितलं. किठौर पोलीस मुलीला शोधण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीयत असे सांगितले आहे.
दरम्यान, पोलिसांनी २४ तासांच्या आत मुलीला शोधून काढलं नाही, तर भाजप गावात महापंचायत बोलवून आर-पारच्या लढाईची घोषणा करेल” असा इशारा भाजप नेते प्रताप सिंह यांनी दिला आहे.