निमिषासाठी एक मुस्लिम धर्मगुरु शेवटची आशा, तोच तिला फाशीपासून वाचवू शकतो, येमेनमध्ये नेमकं काय घडतंय?


नवी दिल्ली : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया यांना होणाऱ्या फाशीपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व शक्य प्रयत्न केल्याचे काल सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. आता सरकारकडे काही करण्यासाठी फारसा वाव उरलेला नाही.

येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला आता एक दिवस उरला आहे. १६ जुलैला तिला फाशी देण्यात येणार आहे. निमिषा प्रियाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहेत.

आता भारताचे ग्रांड मुफ्ती कंठपुरम एपी अबूबकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपानंतर आता निमिषाच्या वाचण्याची एक छोटीसी आशा निर्माण झाली आहे. ग्रांड मुफ्तीच्या विनंतीला मान देऊन येमेनमध्ये विचार विनिमय सुरु झाला आहे. याचं नेतृत्व येमेनचे प्रसिद्ध सूफी विद्वान शेख हबीब उमर करत आहेत. शेख हबीब यांचे प्रतिनिधि हबीब अब्दुर्रहमान अली मशहूर यांनी उत्तर येमेनमध्ये एक इमरर्जन्सी मीटिंग बोलावली आहे.

येमेनी सरकारचे प्रतिनिधी, गुन्हेगारी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश, तलालचा भाऊ आणि आदिवासी नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली? त्या बद्दल अजून माहिती नाहीय. ग्रांड मुफ्तीच्या हस्तक्षेपानंतर निमिषाच्या वाचण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

येमेनमध्ये अस्थिरता आहे. त्यामुळे तिथे भारतीय दूतावास नाहीय असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं. सरकारकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मर्यादीत क्षमता आहे. सरकार निमिषा प्रियाचा मृत्यूदंड टाळण्याचे सर्व प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने एक पत्र पाठवलेलं. शेखच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!