अल्पवयीन मुलीचा २७ वर्षांच्या तरुणासोबत बळजबरी विवाह, मुलीनेच केला पोलिसांना फोन; चौघांवर गुन्हा दाखल

crime : सख्खी बहीण व मेहुण्याने आपल्या मनाविरुद्ध २७ वर्षीय तरुणाशी लग्न लावून दिल्याची माहिती १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने डायल ११२ वर पोलिसांना दिल्यानंतर बालविवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीने डायल ११२ वर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल केली असून सख्खी बहीण, मेहुणा, पतीसह सासूला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव पोलिसांनी या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या पीडितेला पोलिस ठाण्यात आणले. या मुलीचे तिची बहीण सुप्रिया व मेहुणा जयेश भरत अभोई यांनी तिच्या संमतीविना तिचा विवाह बळजबरीने शिरसगाव येथील अनिल राजेंद्र चव्हाण (वय २७) याच्याशी २५ फेब्रुवारी रोजी गुपचूप माव पद्धतीने लावून दिला.

त्यानंतर पीडित नग मुलगी बहिणीकडे चाळीसगाव येथे आली, पती व सासू तिला बळजबरीने सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते.
