अल्पवयीन मुलीला अज्ञान पणाचा फायदा घेऊन पळविले! लोणीकाळभोर येथील घटनेने खळबळ…


लोणी काळभोर : येथील पोलीस ठाण्याचे हद्दीतून एका अल्पवयीन मुलीस तिचे अज्ञान वयाचा फायदा फूस लावुन पळवून नेले आहे. याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४२ वर्षिय फिर्यादी पती, १६ वर्षे १० महिने व १४ वर्षे वयाच्या दोन मुली तसेच १३ वर्षे आणी१० वर्षे वयाच्या दोन मुलांसह एकत्र राहतात. फिर्यादी मजुरी करतात. तर त्यांचे पती पिठाची गिरणी चालवण्याचे काम करतात.

शनिवार (१५ नोव्हेंबर) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे माझे पती कामावर गेले. फिर्यादी व त्यांची मुले १० वाजण्याच्या सुमाराला रामदरा येथे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांची १६ वर्ष १० महिने वर्षे वयाची मुलगी ही एकटीच घरी होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सर्वजण घरी आले त्यावेळी त्यांना मोठी मुलगी दिसली नाही. सर्वानी तीचा गावात तसेच रामदरा बाजुला, शेजारी, आजुबाजुच्या गावात, तसेच आमच्या नातेवाईकांकडे फोन लावुन शोध घेतला.

       

परंतु तिचा कोठेही शोध लागला नाही म्हणून त्यांची खात्री झाली की, तिला कोणीतरी अज्ञात इसमाने, तिचे अज्ञान वयाचा फायदा घेऊन, तिला फुस लाऊन त्यांचे कायदेशिर रखवालीतुन पळवून नेले आहे म्हणून तिचे आईने आपल्या १६ वर्षे १० महीणे १५ दिवस वर्षं वय असलेल्या तसेच अंगाने सडपातळ, रंगाने गोरी, उंची-४ फुट ११ इंच, चेहरा- निमुळता, नाक-सरळ, डोळे काळे पांढरे, केस काळे व लांब, भाषा हिंदी व मराठी बोलते तिचे अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप, त्यावर काळ्या रंगाची पेंन्ट, कळयात चांदीची चैन घातलेली या वर्णनाच्या अल्पवयीन मुलीस तिचे अज्ञान वयाचा फायदा घेऊन अज्ञात कारणासाठी आई-वडिलांच्या कायदेशीर रखावालीतुन तीला फुस लावुन पळवून नेले असल्याची तक्रार अज्ञात इसमाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!