पुण्यात मध्यरात्री अपघाताचा थरार ; भरधाव वेगाच्या दुचाकीची कारला धडक, 2 जण गंभीर जखमी…..


पुणे : पुण्यात मध्यरात्री गरवारे कॉलेज चौकात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या अपघातामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून, एका चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने रस्त्यावर धावणाऱ्या चारचाकी कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चारचाकी कार जागेवरच पलटी झाली. या अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीचा देखील चुराडा झाला आहे.या अपघातात कार चालकही किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून अपघाताला नेमके कोणते कारण जबाबदार होते, याचा तपास सुरू आहे. रात्रीच्या वेळी अति वेगाने वाहन चालवल्याने अशा प्रकारच्या घटना शहरात वाढत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!