‘यशवंत’ च्या शासकीय थकित करांच्या सवलतीसाठी लवकरच होणार बैठक! पुणे बाजार समितीकडून पूरग्रस्तांना २५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूपूर्त….

उरुळीकांचन : ‘यशवंत’ कारखान्याचा जमीन खरेदीच्या अर्थिक व्यवहाराची प्रलंबित कार्यवाही लवकरच पूर्ण करुन, कारखान्यासंरर्भातील शासकीय कर आकारणीसंदर्भात सवलती देण्यासाठी लवकरच मंत्रालयात सर्व खात्यांशी बैठक घेणार असल्याचा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन , पुणे बाजार समितीने पूरग्रस्तांना दिलेल्या २५ लाख रुपयांचा धनादेश पुणे बाजार समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सूपूर्त करण्यात आला आहे.

मराठवाड्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला मदत म्हणून पुणे (हवेली ) कृषी उत्पन्न बाजार समितीने २५ लाख रुपये मदतीचा धनादेश राज्य सहाय्यक निधीकडे सूपूर्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, संचालक गणेश घुले , ‘यशवंत’ चे संचालक संतोष कांचन यांच्याकडून सूपूर्त करण्यात आला. यावेळी पूरग्रस्तांना भरगच्च दिलेल्या मदतीचे आभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणून पूरग्रस्तांना सर्व स्तरांतून मदत होत असल्याचा कृतीचे समाधान व्यक्त केले आहे.

पुणे बाजार समितीच्या वतीने या धनादेश सुपूर्त करण्याचा भेटीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालक मंडळाला ‘यशवंत’ कारखान्याशी सुरू असलेल्या जमीन खरेदी व्यवहाराची कायदेशीर बाबी पूर्ण करुन कारखान्याकडे रक्कम अदा करुन पुढील कार्यवाही च्या सूचना दिल्या आहेत. तसेच कारखान्याशी संबंध विविध वित्तीय संस्थांच्या थकित कर्जाची एक रकमी कर्जफेडीच्या मुद्दावर चर्चा करीत बँकांनी दिलेल्या सवलतीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच कारखान्याला शासकीय कर थकित असणारी सर्व खात्यांशी असणारी रक्कम सवलत देण्यासाठी संयुक्त बैठक मंत्रालय घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरीत कारखान्यासंदर्भात कार्यवाही जलद करण्याचा सूचना दिल्या आहेत.

यांसदर्भात सभापती प्रकाश जगताप म्हणाले, पुणे बाजार समितीने कारखान्याची जमीन खरेदी करण्यासंदर्भात काय कार्यवाही केली आहे. याचा तपशील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच पुढील कार्यवाही स्थानिक अधिकारात करण्याची तातडीने करा, अशा सूचना देत बाजार समिती व कारखाना योग्य सन्मन्वय साधून कार्यवाही पूर्ण करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कामकाजाची माहिती दिली.
