नवऱ्याचा बायकोवर डोक्यात कुऱ्हाडीने वार, संताप अनावर झाला अन् सगळं पुणे शहर हादरलं..


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

अशातच आता पुण्यातील तळजाई वसाहतीत एका पतीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पूनम दत्ता अडागळे (वय. ३२) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, दत्ता राजाराम अडागळे (वय. ३८) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पूनम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. दत्ता काहीही काम करत नव्हता आणि त्याला दारूचे व्यसन होते. पूनम घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री आठच्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला आणि त्याने पूनम यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

पूनम यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दत्ताने घरातील कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला केला. पूनम यांनी आरडाओरडा केल्याने त्यांची सासू मदतीसाठी धावली. मात्र, दत्ताने पूनम यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. सोमवारी रात्री आठच्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला. त्याने दारू पिण्यासाठी पूनमकडे पैसे मागितले होते.

दरम्यान, सहकारनगर पोलिसांनी दत्ताला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दत्ता याचा पूनमशी २०१५ मध्ये विवाह झाला असून, त्यांना ७ वर्षांचा मुलगा आहे. दत्ता काहीही काम करत नव्हता, तसेच त्याला दारूचे व्यसन आहे. पूनम घरकाम करतात. पतीच्या हल्यानंतर पूनमने आरडाओरडा केली. तेव्हा सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कुर्हाडीचा डोक्यात घाव बसल्याने पूनम या गंभीर जखमी झाल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!