बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर होण्याची मोठी संधी, मिळणार एवढा पगार, अर्ज कसा करावा?, जाणून घ्या संपुर्ण माहिती..

नवी दिल्ली : बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच bankofbaroda.in यावर जाऊन अर्ज करायचा आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये १२६७ व्यवस्थापक आणि इतर अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी म्हणजे उद्याच आहे. बँक ऑफ बडोदामध्ये ग्रामीण आणि कृषी बँकिंगमध्ये २०० पदे भरण्यात येणार आहे.

MSME बँकिंगमध्ये ३४१ पदे भरण्यात येणार आहे. सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये २२ पदे भरण्यात येणार आहे. कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिटमध्ये ३० पदे भरण्यात येणार आहे.फायनान्समध्ये १३ पदे भरण्यात येणार आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजीमध्ये १७७ रिक्त पदे आहेत.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन टेस्ट, सायकोमॅट्रिक टेस्टद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत घेतली जाईल. या नोकरीसाठी ऑनलाइन चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.
किती मिळणार पगार..
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० ते १,३५,०२० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.