महागाईचा दुहेरी फटका! इंधन दरवाढीनंतर आता कर्जदारांनाही झटका; 8 जूनपासून नवे दर लागू


मुंबई : कर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील आघाडीची खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेतलेल्या तसेच नवीन कर्ज घेण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांवर होणार आहे.

बँकेने MCLR मध्ये 10 बेसिस पॉइंट्सची वाढ केली असून नवीन दर 8 जूनपासून लागू झाले आहेत. त्यामुळे MCLR शी जोडलेल्या कर्जांच्या EMI मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

बँकेच्या नव्या दरानुसार, विविध कालावधींसाठीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. विशेषतः दोन वर्षांच्या कालावधीसाठीचा MCLR दर 8.55 टक्क्यांवर पोहोचला आहे. बँकेने हा निर्णय निधी उभारणीचा वाढता खर्च आणि बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन घेतल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, HDFC बँकेनंतर कॅनरा बँकेनेही आपल्या काही कर्जदरांमध्ये 5 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात इतर बँकाही व्याजदर वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निर्णयामुळे लाखो कर्जदारांच्या मासिक EMI वर अतिरिक्त भार पडू शकतो. विशेषतः गृहकर्जधारक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मासिक बजेटवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकांनी व्याजदर आणि EMI चे गणित नीट तपासून पाहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!