फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, नागपूर राडा तपासात हादरवून टाकणारी माहिती आली समोर..

नागपूर : नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यातून तुफान दगडफेक झाली. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. जाळपोळ झाली. अनियंत्रित जमावाला आवरताना पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले.
या हिंसाचारामुळे नागपूरच्या अनेक भागात अजूनही संचारबंदी कायम आहे. नागपूरमधील या राडा प्रकरणात फहीम खान हे नाव समोर आले आहे. फहीम खान या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. या फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फहीम खानसह ५० आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
या हिंसाचाराच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बांग्लादेशातील दहशतवादी संघटनेचा या नागपूर राडा प्रकरणात सहभाग असल्याच समोर आले आहे.
नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले व्हिडिओ इतर देशातील आहेत. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल १७२ व्हिडिओ सापडले आहेत. बांग्लादेश आणि इतर देशातील IP अड्रेसवरुन हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. १७२ व्हिडिओंचा IP अड्रेस आणि मोबाइल नंबरचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दरम्यान, नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानच मालेगाव कनेक्शन समोर आलं आहे. फहीम खान पाच महिन्यांपूर्वी मालेगावात येऊन गेल्याच समोर आलय. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती. MDP पार्टी काढून मालेगाव मध्य मधून मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.