अंधारामुळे घात ! पुण्याजवळ कारने महिलांच्या घोळक्याला उडवले, ५ ठार, १३ गंभीर…!
पुणे : खेड (ता. शिरोली) गावानजीक पणे नाशिक मार्गावर एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने महिलांच्या घोळक्याला धडक दिली. या घटनेत ५ महिला या जागीच ठार झाल्या आहेत. तर १३ महिला या जखमी झाल्या असून त्यातील काहींची प्रकृती ही गंभीर आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली. जखमी महिलांना पुण्यात आणि चाकण येथील दवाखाण्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार ,सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे अशी दोन मृत महिलांची नावे असून अन्य मृतांची नावे समजू शकली नाहीत. खेड तालुक्यातील खरपुडी फाट्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात स्वयंपाक करणाऱ्या या महिला होत्या. त्याच्या गटात तब्बल १८ महिला होत्या. या महिला पुणे नाशिक मार्गाने लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या. यावेळी या महिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्याने त्या मंगलकार्यालयात जाण्यासाठी पुणे नाशिक महामार्ग ओलंडत होत्या.
याचवेळी पुण्याच्या दिशेकडून आलेल्या एका भरधाव वाहनाने या महिलांच्या घोळक्याला जोरात धडक दिली. यात पाच महिला या जागीच ठार झाल्या तर १३ महिला या जखमी झाल्या आहेत. या वेळी पोलिस देखील येथून जात होते. त्यांनी तातडीने जखमी महिलांना दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्यांच्यावर चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात तर पुण्यातील काही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.