उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उद्या शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या नेत्याचा पक्ष प्रवेश..


मुंबई : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरु होती ती अखेर खरी ठरली आहे. कोकणातील ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून, ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

तसेच राजन साळवी यांनी शिवसेना भवनात आपला राजीनामा सादर केला असून, उद्या ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील उत्साहानंतर विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेचे निष्ठावान नेते समजले जाणारे राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच समजतय. उद्या दुपारी 3 वाजता राजन साळवी ठाण्यातील आनंदाश्रमात शिवसेनेत अधिकृत पक्ष प्रवेश करतील. १ वाजता नवी मुंबईतील सिडको भवन इथून हजारों कार्यकर्त्यांता ताफा घेऊन ते ठाण्यात येतील.

अडीचवर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. दोन गट तयार झाले. सुरुवातीला ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. पण राजन साळवी हे मात्र उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. त्यांच्यामागे एसीबी चौकशीचा ससेमिराही लागला होता. विधानसभा निवडणूक निकालानंतर राजन साळवी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या सातत्याने येऊ लागल्या. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!