चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, शिरूर तालुक्यातील घटनेने खळबळ..

शिरूर : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरण ताजं असताना पुण्यात १९ वर्षीय तुरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. शिरूर तालुक्यात शनिवारी रात्री दोन तरुणांनी एका १९ वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.
घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ ॲक्शन घेत दोन आरोपींना १२ तासाच्या आत अटक केला आहे. अमोल पोटे (वय.२५ रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मुळ राहणार (रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि.अहील्यानगर) आणि किशोर काळे (वय.२९) रा. कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ (रा. किल्ले धारुर, ता.धारुर जि.बीड) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित महिला तिच्या चुलत भावासोबत घराजवळील निर्जन ठिकाणी बसली होती. तेव्हा दोन अज्ञात पुरुष दुचाकीहून त्या ठिकाणी पोहचले. दोघांनी तरुणीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. एवंढच नाही तर, व्हिडीओ देखील तयार केले.
दरम्यान, त्यानंतर पीडित तरूणीच्या मामे भावाला त्यातील एकाने थोड्या अंतरावर घेवून गेला तर दुसऱ्याने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्यांने देखील पिडीतेवर बलात्कार केला आणि तिच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून ते दोघेही निघून गेले.
या घटनेची माहिती पीडितेने आपल्या बहिणीला दिल्यानंतर कुटुंबातील इतर व्यक्तींनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचा गांभीर्य पाहता पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोघांना १२ तासाच्या आत अटक केली आहे.