तब्बल 11 पूल, अनेक पायाभूत सुविधा, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा चेहेरा-मोहरा बदलणार..

नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक, सामाजिक, पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी दिली. तसेच याबाबत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच अनेक सूचना देखील दिल्या.
सध्या या ठिकाणी सुरु असलेली कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. राज्य शासनातर्फे या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी देण्यात येईल. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामे केली जातील. गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत. असेही फडणवीस यांनी सांगितले.
2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता एक मास्टर प्लॅन तयार आहे. मास्टर प्लॅनमध्ये 11 पूल आणि अनेक रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, टेंट सिटी आणि सहभागींसाठी निवासी सुविधा, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पवित्र जलाशयांचे जीर्णोद्धार आणि नवीन घाटांचा विकास यासह नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.
त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांना त्वरीत सुरुवात करावी, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. यावेळी अनेक अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत. त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांना त्वरीत सुरुवात करावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी ते सोवळे वत्र परिधान करून गर्भगृहात उतरले. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेवाची पूजा केली.
तसेच सभामंडपात संकल्प पूजा अभिषेक करण्यात आला. यानंतर फडणवीस यांनी साधू-महंतांशी सिंहस्थाबाबत चर्चा देखील केली. देवेंद्र फडणवीस यांनी साधू-महंतांचे म्हणणे जाणून घेतले. तसेच याबाबत काय अडचण आहे का? याबाबत देखील विचारणा केली.