लोणी काळभोर येथील दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, उरुळी कांचन येथील तरुणाला बेड्या..


उरुळी कांचन : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीची छेडछाड करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता.१) दुपारीअडीच आणि सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन येथील एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. आर्यन अरविंद यादव (वय.१९ , रा. उरुळी कांचन ता. हवेली जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निर्भयाच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे लोणी काळभोर परिसरात राहतात. तर त्यांची मुलगी उरुळी कांचन येथील एका नामांकित शैक्षणिक संकुलात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान, आर्यन याने निर्भया याच्या घराचा दरवाजा लावला. निर्भया घराबाहेर आल्यानंतर आर्यनचे तिचा हात पकडला. आणि म्हणाला, तु मला खुप आवडतेस असे म्हणुन निर्भयाच्या मनास लज्जा उत्पन्न करुन तिचा विनयभंग केला त्यावेळेस तिने त्याला नकार दिला.

त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करुन तेथून निघुन गेला. त्यानंतर आर्यन पुन्हा निर्भयाच्या घरी गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बुलेटवरून आला. त्यावेळी निर्भयाचे वडील त्याला समजावुन सांगण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा आर्यनचे त्यांना देखील शिवीगाळ करून निघून गेला.

याप्रकरणी निर्भयाच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस तत्काळ गाठले. आणि आर्यनचे विरोधात तक्रार दिली. त्यानुसार आर्यनच्या विरोधात भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम 74,75,77, 352 सह लैंगिक अपराधापासुन बालंकाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक केली आहे.

दरम्यान, ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, रत्नदीप बिराजदार, पोलिस हवालदार गणेश सातपुते, उषा थोरात, पोलिस अंमलदार राहुल कर्डिले, किशोर कुलकर्णी यांच्या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!