पुणे हादरलं! बापाने मुलीवर बलात्कार केल्यामुळे झाली ५ वर्षांची शिक्षा, शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा मुलीवर…

पुणे : पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना पुण्यातून समोर आली आहे. पोटच्या मुलीवर बलात्कार करून त्यानंतर शिक्षा भोगून परत आलेल्या बापाने पोटच्या लेकीवर पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
ही घृणास्पद घटना आंबेगाव तालुक्यात घडलीये. सदर व्यक्तीवर पून्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहिती नुसार, पोटच्या अल्पवयीन लेकीवर बलात्कार प्रकरणी न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगून पुन्हा घरी परतल्यावर त्या नराधम बापाकडून त्याच लेकीवर वारंवार अत्याचार करण्यात आला.
बापाच्या कृत्याला कंटाळून पीडित मुलीने पोलीसांत तक्रार दाखल करण्यात केली आहे. बलात्कारी बापाला पारगाव पोलीसांनी अटक केलीये. असे घृणास्पद कृत्य करणा-या बापाला जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी असा संताप आंबेगाव तालुक्यात व्यक्त होत आहे.
Views:
[jp_post_view]