मणिपूर जळत आहे, आणि मोदी हसत आहेत, त्या कृत्यावरून राहुल गांधी यांनी मोदींवर साधला निशाणा…

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरून विरोधी पक्षाने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर कोणतंही ठोस भाष्य न करता हसत हसत मणिपूरची चेष्टा केली.

मणिपूरमध्ये लोक मरतायेत, महिलांवर अत्याचार होतायेत आणि आपले पंतप्रधान संसदेत हसून भाषण करतायेत, भारताच्या पंतप्रधानांना हे वागणं शोभत नाही.
खरंतर पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पदाचं गांभीर्यच राहिलेलं नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाचा समाचार घेतला.

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने आणलेल्या ‘अविश्वास प्रस्तावा’ला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २ तास १३ मिनिटांचं लांबलचक भाषण केलं.
ज्या मुद्द्यांवरून विरोधकांनी अविश्वास ठराव आणला, त्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी अगदी चार-पाच मिनिटेच बोलले. मोदींच्या याच भाषणाचा समाचार राहुल गांधी यांनी राजधानी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूर जाळायचे आहे. त्यांना तिथली आग विझवायची नाहीये. त्यामुळेच मी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाल्याचे म्हटले होते.
मी हे विधान उथळपणे केलेलं नव्हते. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आगीचा वणवा पेटलाय, लोक मारले जातायेत, महिलांवर बलात्कार होतायेत, लहान मुलांना मारले जातंय आणि आपले पंतप्रधान संसदेत हसून भाषण करतायेत.
गंभीर विषयावर बोलत असताना हसत हसत, विनोद करत, विरोधकांची खिल्ली उडवत भाषण करणं भारताच्या पंतप्रधानांना हे वागणं शोभत नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली.