प्रवाशांना मोठा दिलासा! मुंबई-कोल्हापूर एकेरी विशेष रेल्वे…


मुंबई : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी एकेरी स्पेशल गाडी चालविण्याची घोषणा केली. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०९९ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२ ऑगस्ट २०२३ रोजी (मध्यरात्री) १२.३० वाजता सुटेल आणि सकाळी ११.३० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे पोहोचेल.

हे असणार थांबे..

ही एकेरी स्पेशल दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!