महिलेला मिठी मारण्यामागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता, बृजभूषण सिंह यांनी सांगितले ‘ते’ कारण…


नवी दिल्ली : एखाद्या महिलेला कोणताही वाईट हेतू न ठेवता मिठी मारणे हा गुन्हा होऊ शकत नाही, असे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी दिल्लीतील न्यायालयात स्पष्ट केले. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे.

महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे कुस्तीपटू अनेक दिवस आंदोलन देखील करत होते. दरम्यान कोर्टात बृजभूषण सिंह यांनी मॅजिस्ट्रेट हरजीत सिंह जसपाल यांच्यासमोर त्यांच्या वकिलामार्फत आरोपांना प्रतिउत्तर दिले आहे.

यावेळी खासदार सिंह आणि विनोद तोमर यांच्यावर आरोप निश्चितीबाबत न्यायालयात युक्तीवाद झाला. सिंह यांच्या वतीने वकील राजीव मोहन यांनी न्यायालयाला सांगितले की, बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेले आरोप खून जूने आहेत.

तसेच वकिलामार्फत ते म्हणाले की, तक्रारदार गेल्या पाच वर्षांपासून मोकळेपणाने फिरत आहेत. गेल्या पाच वर्षांत एकदाही पुढे आले नाहीत. मात्र, पाच वर्षांनंतर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला धोका आहे, तर हे वैध ठरत नाही.

तसेच न्यायालयाला या आरोपांवर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. कारण विदेशात हा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे यामध्ये काही तथ्य नाही. तसेच अनेक प्रशिक्षक हे पुरुष आहेत.

त्यानंतर राजीव मोहन युक्तीवाद करताना म्हणाले, कुस्ती हा एक असा खेळ आहे, ज्यामध्ये बहुतांश प्रशिक्षक पुरुष असतात. क्वचितच महिला प्रशिक्षक पहायला मिळतात.

यश मिळाल्यानंतर आनंदाच्या भरात कोणी एखाद्या खेळाडूला मिठी मारत असेल तर तो गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी कोर्टात आपली बाजू मांडली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!