खेड येथे डोंगरावर आढळलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी लावला छडा, खुन्नस देऊन बघितल्याच्या वादातून खून; आरोपीला बेड्या, खेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची संयुक्त कामगिरी

पुणे : खेड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सांडभोरवाडीचेही पाट येथे जंगलात डोंगर उतारावर सापडलेल्या मृत्यदेहाच्या खुनाचा उलघडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. खुन्नस देऊन पाहिल्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचे कारणावरून चाकुने व दगडाने खुन केल्याचे उघडकीस आले आहे.
सौरभ नंदालाल पाटील (वय २३ वर्षे रा. सुरभ साई पंढरीनगर, पिंपळवाडी रोड शिर्डी ता. राहाता जि. अहमदनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयुर संदीप दळवी, (रा. जुनी मामलेदार कचेरी, सराफबाजार, कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर यास खेड पोलीस स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, एक बेवारस मृत्यूदेह सापडल्यानंतर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस असल्याने हा गुन्हा उघडकीस आनण्याचे काम निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्र खेड पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.
त्यानुसार दोन विशेष पथके तयार करून त्यामार्फत गुन्हयाचा तपास सुरू करण्यात आला होता. तपास चालू असताना यातील आरोपीताने कोणताही पुरावा मागे न ठेवता रात्रीचे वेळी निर्जन ठिकाणी केलेला असल्याने गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करणे अत्यंत अवघड जात होत. तरीही तपास पथकांनी सौरभ नंदालाल पाटील असे मृत्यूदेहाचे नाव असल्याचे निष्पन्न केले.
तसेच तपास पथकांनी सौरभ पाटील याचे पुर्व इतिहास पडताळला असता मयुर संदीप दळवी याचेसोबत भांडणे झाल्याबाबतची गोपनीय माहीती प्राप्त केली.
त्यानुसार मयुर दळवी खेड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता, सौरभ पाटील व मयुर दळवी या दोघांचा संजिवनी कॉलेज कोपरगाव येथे शिक्षण घेत असताना खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून भांडण झाले होते.
त्या भांडणाच्या कारणावरून सौरभ पाटील याचा चाकुने व दगडाने खुन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.