तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदाचा वाद पेटला! अध्यक्षपदी ख्रिश्चन नेते, भाजपसह तेलगू देसम पक्षाचा विरोध, कारण…


हैदराबाद : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थान बोर्डाचे अध्यक्षपद आमदार भुमना करुणाकर रेड्डी यांना दिल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करुणाकर रेड्डी यांचे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करते, हे त्यामागचे कारण आहे. आंध्र सरकारच्या या निर्णयावर भाजप, तेलगू देसमसह अनेक विरोधी पक्षांनी या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे आता ही निवड कायम राहणार की बदल होणार हे लवकरच समोर येईल.

तसेच हिंदू धर्मावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला मंदिराचा अध्यक्ष कसा बनवता येईल, असा सवाल तेलगू देसमचे प्रदेश सरचिटणीस बुची राम प्रसाद यांनी केला. रेड्डी ख्रिश्चन धर्म मानतात. त्यांच्या मुलीचे लग्नही ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार झाले होते, हे साऱ्या जगाने पाहिलेले आहे.

ते हिंदू नाहीत, याला आणखी काय पुरावा हवा, असेही ते म्हणाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डी पुरंदेश्वरी यांनीही या पदावर हिंदूच असावा, ही अपेक्षा व्यक्त केली आहे. यामुळे आता हिंदू आक्रमक झाले आहेत.

भाजप नेते तसेच तिरुपती बोर्डाचे माजी कार्यकारी अधिकारी आय. वाय. आर. कृष्णराव यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली. तिरुपती विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय नियुक्ती होणेच मुळात दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

माझे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करत असले तरी मी मात्र हिंदू धर्माचे पालन करतो, असे भुमना करुणाकर रेड्डी यांचे म्हणणे आहे. यामुळे आगामी काळात याचे पडसात उमटण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!