मसाला आता लागणार अधिकच तिखट! मसाल्याच्या दरात ‘एवढ्या’ टक्यांची वाढ…


पुणे : अन्नधान्यासह मसाल्यांच्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आधीच भाज्यांचे दर गगनाला भिडले असताना नागपुरात मसाल्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या किचनचं बजेट कोलमडले आहे. बहुतांश मसाल्यांचे दर ५० ते ८० टक्क्यापर्यंत वाढले आहेत.

आधी मोठी वेलची ही ५५० रुपये किलो होती ती आता ११५० रुपये किलो झाली. मगज बी जे ३०० रुपये किलो होते ते आता ८०० रुपये किलो झाले आहे. खसखस जी १००० रुपये किलो होती ती आता १६०० रुपये किलो झाली आहे.

जिरे जे दोन महिन्यांआधी २५० रुपये होते ते आता ७०० रुपये किलो झाले आहेत. छोटी वेलची १५०० रुपये किलो होती आता २४०० रुपये किलो झाली आहे. लवंग जी आधी ७५० रुपये किलो होती आता १००० रुपये किलो झाली आहे.

काळी मिरी जी आधी ५०० रुपये किलो होती ती आता ८५० रुपये किलो झाली आहे. यामुळे सामान्य नागिरकांच्या खिश्याला मोठी कात्री बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!