मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा मोठा अपघात, १६ जणांचा जागीच मृत्यू…


मुंबई : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. यामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

ही घटना ताजी असताना तोच पुन्हा समृद्धी महामार्गावर शहापूर येथे मोठी दुर्घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके कितीजण दबले, हे सांगता येऊ शकत नाही.

जखमींना जखमीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. त्या ठिकाणी २२ कर्मचारी काम करत होते.

दरम्यान, मध्यरात्रीपर्यंत चौदा कामगारांचे मृतदेह शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले होते. शहापूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राहुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर झालेल्या दुर्घटनेत मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!