बळजबरीने लग्न करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, पुण्यात एकावर गुन्हा दाखल…!

पुणे : पुणे येथे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने तरुणीकडून 10 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

यामध्ये पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून सौरभ सुपेकर असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने मुलीसोबत जबरदस्तीने तिच्याशी विवाह केला. तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
संबंध ठेवताना त्याने अश्लील व्हिडीओ काढले आणि ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने तिच्याकडून 10 लाख रुपये देखील काढले. तिला वेळोवेळी धमकी देऊन त्याने जबरदस्ती केली.

गेल्या तीन वर्षांपासून तो तिच्याकडून पैसे काढत आहे. दरम्यान पुण्यात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच मैत्रिणीचा अश्लील व्हिडीओ पोर्न वेबसाईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
