पुणे आरटीओ कार्यालयात ५७ वाहनांचा जाहीर ई-लिलाव…!


पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ५७ वाहनांचा जाहीर ई-लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, आळंदी रोड कार्यालय व वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये टुरिस्ट टॅक्सी, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचनाफलकांवर व तसेच https://eauction.gov.in/eauction या संकेतस्थळावर माहितीसाठी लावण्यात आली आहे. तसेच लिलावाचे अटी व नियम ६ फेब्रुवारीपासून या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध असतील.

जाहीर ई-लिलावात ७ ते ९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://eauction.gov.in/eauction या संकेतस्थळावर सहभागी होता येणार आहे. जीसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात हलके वाहनास २५ हजार रुपये व अवजड वाहनास ५० हजार रुपये रकमेचा धनाकर्ष ‘आरटीओ पुणे’ या नावे सादर करावा. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील.

कोणतेही कारण न देता ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!