मोठी बातमी! आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर? कारण आलं समोर…

मुंबई : शिवसेना (शिंदे गट) आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदारांकडून पुन्हा एकदा मुदतवाढ मागण्यात आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. याबाबत उत्तरं देखील देण्यात आली आहेत.
या नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता, मात्र आता शिवसेनेच्या आमदारांनी पुन्हा एकदा मुदतवाढ मागितली आहे. यामुळे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

याबाबत त्यांच्या उत्तराचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये या सर्व प्रकरणावर चर्चा झाली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अजून १४ आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणे बाकी आहे. त्यातच पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे हे प्रकरण लांबणीवर जाईल.