संभाजीनगर येथे नात्याला काळिमा फासणारी घटना! सख्ख्या भावाने केला बहिणीवर बलात्कार, गर्भवती राहिल्यावर…


संभाजीनगर : संभाजीनगर येथे भाऊ आणि बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सख्ख्या भावानेच अल्पवयीन बहीणीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केले. दरम्यान, डीएनए चाचणी केल्यावर हा गुन्हा उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी, गंगापुर तालुक्यातील पीडित मुलीने पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीत मावस भावाने ऑक्टोबर २०२२ मध्ये आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने म्हटले होते.

दरम्यान, यातुन ती गर्भवती राहिली होती. मात्र, काही दिवसांनी म्हणजेच २४ मार्च २०२४ रोजी तिने आपला जबाब बदलला. तिने पुरवणी जबाबात सख्ख्या भावाने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला.

या प्रकरणी तिचा सख्ख्या भावसह मावस भावावरही पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पुराव्या अभावी मावस भावाला सोडण्यात आले आहे.

प्रकरण काय?

औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका गावातील अल्पवयीन मुलीनं मावस भावजीनं आपला बलात्कार केल्याचा फिर्याद स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला होता.

यात तिने म्हटले होते की, माझ्या मावस बहिणीचा पती घरी कोणी नसताना आमच्या घरी आला होता. त्यावेळी तो मला म्हणाला की, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू जर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुझ्या पोटात चाकू भोकसून तुला जिवंत मारून टाकील. असं म्हणत त्यानं बळजबरीनं माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग केला.

त्यानंतर मामाच्या घरी असतानाही मावस बहिणीचा पती तिथं आला आणि बळजबरीनं माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. मी भीतीपोटी ही घटना घरात कुणालाही सांगितली नाही.

तसेच मला मासिक पाळी येत नसल्यानं मी माझी आई आणि आजी यांना सांगितलं. पुढे आम्ही तीन महिने मासिक पाळी येण्याची वाट पाहिली. त्यानंतर मी माझ्या आईला मावस बहिणीच्या पतीनं माझ्यासोबत दोनदा बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगितलं.

आईच्या सांगण्यावरुन प्रेगन्सी कीट घरी आणून तपासणी केली असता मी गरोदर असल्याचे आम्हाला समजले. त्यानंतर पोलिस स्टेशनला येऊन तक्रार दिली. त्यानंतर या पीडितेचा गर्भपात करण्यात आला.

तिच्या डीएनएचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. काही दिवसांनी पीडितेनं १८ मार्च २०२३ रोजी पुरवणी जबाब दिला. त्यामध्ये तिनं सख्ख्या भावानेच आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं नमूद केलं.

ख्रिसमसच्या सुट्ट्यात १० दिवस तिचा भाऊ घरी आला असतांना त्याने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिला गर्ववती केल्याचे पीडीतेने म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाची परवानगी घेऊन तिचा आणि तिच्या भावाची डीएनए चाचणी करण्यात आली.

यात भावानेच बहीणीवर अत्याचार करत तिला गर्भवतीकेल्याचे उघड झाले. यानंतर पीडितेच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित मावस भावावर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याला जमीन मंजूर केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!