मोठी बातमी! दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी, प्रशासनाचा निर्णय..


पणजी : दूधसागर धबधबा येथे अतिउत्साही पर्यटकांना मागच्या वर्षी प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि वनविभागाने या धबधब्यावर जाण्यास पर्यटकांवर बंदी घातली आहे. यामुळे याठिकाणी कोणीही जाऊ नये.

धबधब्याकडे जाण्यास रेल्वे पोलिस आणि वन खात्याने बंदी घातली असून त्या बद्दल रेल्वेमध्ये पोलिसांच्याकडून घोषणा केली जात आहे. दूधसागर धबधबा दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील कुळे येथे आहे.

दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी रेल्वे मार्गाच्या बाजूने चालत जावे लागते. धबधब्याकडे रेल्वेची वेग कमी होतो, त्यावेळी पर्यटक आपला जीव धोक्यात घालून खाली उतरतात. यामुळे धोका निर्माण होतो.

त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी यासाठी अनेक कर्मचारी देखील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!