ते खरे नवरा बायको नाहीतच! या लोकप्रिय जोडप्याचे लग्न खोटे, कंगनाने केला मोठा गौप्यस्फोट…


मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने यावेळी बॉलीवूडमध्ये माफियाराज आणि त्याचा मानमानीपणा याकडे लक्ष वेधले आहे. याशिवाय मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय सेलिब्रेटींविषयी तिनं केलेली टिप्पणी गंभीर आहे. त्यामुळे कंगना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.

कंगनानं तिच्या इंस्टा स्टोरीवर जे लिहिले आहे त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं एका लोकप्रिय कपल्सविषयी लिहिताना त्यांनी केलेलं लग्न खोटं असल्याचे म्हटले आहे.

ते जोडपं माझी भेट घेण्यासाठी अनेकांकडे गयावया करत होतं. अशा शब्दांत तिनं त्या सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे. कंगनानं ज्यांचे नाव घेतले आहे. ती जोडी सध्याच्या घडीला प्रचंड लोकप्रिय आहे.

सोशल मीडियावर ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तिनं अप्रत्यक्षपणे रणबीर कपूर आणि आलिया भट्टवर निशाणा साधला आहे. असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. पण त्यांनी कंगनाचे काय वाईट केले आहे, असा प्रश्नही तिला नेटकऱ्यांनी विचारला आहे.

त्यांनी केलेलं लग्न हे कसे खोटे होते हे सांगण्याचा प्रयत्न कंगनाने केला आहे. मात्र यासगळ्यात कंगनाच्या त्या पोस्टमध्ये रणबीर आणि आलियाचे नाव नाही. नेटकऱ्यांनी त्या नावाची चर्चा सुरु केली आहे.

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, त्या अभिनेत्याने माफिया डॅडीच्या दबावाला बळी पडून ते लग्न केले असे मला सांगायचे आहे. त्याने सांगितले होतं की, वडिलांच्या मनात असलेल्या मुलीसोबत लग्न केले. की त्याला ट्रायालॉजी रिटर्न चित्रपट मिळणार. मात्र ट्रायलॉजी बंद झाली आणि तो आता त्या फेक मॅरेजमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. असा आरोप कंगनानं केला आहे.

मात्र यासगळ्यात एक विशेष बाब म्हणजे, यासगळ्यातून त्या अभिनेत्याला बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही. त्यानं आता त्याच्या संसारावर फोकस करण्यासाठी स्वताला वेळ द्यायला हवा.

ते त्याच्यासाठी जास्त महत्वाचे आहे. हा भारत आहे. आणि आपल्या देशात एकदा का लग्न झाले की, मग काही खरं नाही. तेव्हा त्याच्याकडे आणखी सुधारण्यासाठी वेळ आहे. अशा शब्दांत कंगनाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!