महिलांनो स्फूर्ती आणि कोमलतेसाठी मसाज कराच

उरुळीकांचन : मसाजचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे शरीरात स्फूर्ती व त्वचेत कोमलता येते. दुसऱ्या शब्दात याला मालीश म्हणतात. हा दिवसभराचा क्षीण घालवून जसा आराम देतो तसाच गंभीर रोगांपासून मुक्तीही देतो. त्यामुळे प्रत्येकाने मसाज करावाच. डॉक्टर देखील नेहमीच मसाज करण्याचा सल्ला देतात
साबणाचा शोध लागला नव्हता तेव्हा लोक तेलानेच शरीराची मालीश व सफाई करीत असत. प्राचीन काळाप्रमाणे आधुनिक युगातही तेल मसाजाचे महत्त्व लोकांनी मानले आहे आणि ब्यूटी पार्लरमध्ये यांची खास ट्रीटमेंट दिली जाते. मसाजाचे दोन प्रकार आहेत. कोरडा व ओला. कोरडा मसाज जलोदराच्या व्याधीत तसेच तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त असतो. ओला मसाज तेलाद्वारे केला जातो. याद्वारे लकवा, संधिवात, मुकामार आदींवर उपचार करता येतात. मसाजाच्या वेळी वा मसाजानंतर लगेच नेहमीच झोप येत असते. मानसिक ताण दूर करण्यास मसाज मदत करते.
*बाळाचा मसाज:* बाळाच्या मसाजाची प्रक्रिया बाळ व आईला भावनिक रूपात जोडत असते. बाळाचे रूक्षपणा, पोलिओ इ. सारखे अनेक रोग तेल मसाजाने नाहीसे होतात. मसाजाने बाळाच्या स्नायूंमध्ये ताण निर्माण होऊन त्याच्या शरीराच्या वळ्या हळूहळू कमी होतात. पाठीचा कणा मजबूत होतो व संपूर्ण शरीराला शक्ती मिळते.
मसाजसाठी तेल : मसाजासाठी उपयुक्त असणारे तेल आयुर्वेदिक जड़ी- बुर्टीपासून तयार केलेले असते. यामध्ये मोहरी, खोबरे, तीळ, बदाम व जैतून यांची तेले आहेत. वातावरणानुसार तेल कोमट करून वापरता येऊ शकते. तेल शरीरात जिरेपर्यंत मसाज करावा. त्यामुळे शरीरातील रक्तभिसरण व्यवस्थित होऊ लागते.
महिलांसाठी अन्य काही घरगुती खास टिप्स
■ भाजल्यास चटकन मध लावावा.
फोड येणार नाहीत.
■ कपड्यावरील पानाचे डाग काढण्यासाठी कच्चा बटाटा घासावा व नंतर थंड पाण्याने धुवावे.
■ कोरड्या डिंकात कधीही पाणी मिसळू नये. त्यामुळे तो खराब होईल. त्याऐवजी व्हिनेगर मिसळावे.
■ शरीरावरील तीळ नाहीसा करण्यासाठी कोथिंबीर वाटून लावावी.
■ कोणत्याही भांड्याला दुर्गंधी येत असेल तर ते मीठाच्या कोमट पाण्यात बुडवून ठेवावे.
■ ओल्या मटाराचा ताजेपणा व चमक टिकवून ठेवण्यासाठी उकळत्या पाण्यात मटार टाकून ५-६ मिनिटे झाकण ठेवावे. नंतर ते काढून थंड पाण्यात घालावेत व नंतर वापरावेत.
■ भरले पराठे करण्यासाठी पराठे हे मधे जाड व चारी बाजूने पातळ लाटावेत. पराठ्यात सारण भरून त्यावर पाकिटाप्रमाणे चारी कडा दुमडाव्यात. यामुळे पराठा एकसारखा होईल व सारण सर्वत्र सारखे पसरेल.