पोलीसच बनले राक्षस! पोलीस कर्मचाऱ्यासह सराफाचा महिलेवर बलात्कार, बारामतीत आठ जणांवर गुन्हा दाखल..


बारामती : एका महिलेची फसवणूक करत पोलिस कर्मचारी व अन्य एकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामतीतील एकूण आठ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पावसात बाहेर पडताना काळजी घ्या! कोंढवा येथे पावसामुळे आडोशाला थांबलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शिवाजी राजाराम निकम, भरत ओसवाल, कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम, समीर शेख व दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील शिवाजी निकम हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात तर श्रीकांत निकम हे अकलूज पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत.

हडपसरच्या दस्तनोंदणी कार्यालयाचे होणार स्थलांतर! अनेक दिवसांनंतर झाला निर्णय

मिळालेल्या माहिती नुसार, पिडीतेकडून ८० तोळे सोने घेऊन त्या बदल्यात फक्त वीस लाख रुपये देऊन उर्वरित सोन्याचा अपहर करून फिर्यादीची फसवणूक केली, तसेच सोने परत देतो म्हणून शक्ती प्लाझा खाटीक गल्ली बारामती येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला व जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली.

पुणे हादरलं! मित्रांच्या मदतीने पत्नीवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

दरम्यान, कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम व समीर शेख यांनी फिर्यादीस गरुड बाग येथे बोलावून जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली, अशा स्वरूपाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे याबाबत पुढील तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!