पावसात बाहेर पडताना काळजी घ्या! कोंढवा येथे पावसामुळे आडोशाला थांबलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू


पुणे : पावसात आडोशाला थांबलेल्या तरुणाला तारेच्या कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कोंढवा भागात घडली आहे.

अजयकुमार विनोदकुमार वर्मा (वय ३०, रा. पवार चाळ, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विनोदकुमार फेरारीराम वर्मा (वय ५०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

मिळालेल्या माहिती नुसार, विनोदकुमार यांचा मुलगा अजयकुमार कामानिमित्त घरातून बाहेर पडला. अचानक पाऊस सुरू झाल्याने अजयकुमार कोंढव्यातील ब्रम्हा इस्टेट सोसायटीच्या सीमाभिंतीलगत असलेल्या तारेच्या कुंपणाजवळ थांबला. तारेच्या कुंपणात वीजप्रवाह उतरला होता. विनोदकुमार याच्या हाताचा स्पर्श तारेच्या कुंपणास झाला. कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून तो बेशुद्ध पडला.

नागरिकांनी बेशुद्धावस्थेतील अजयकुमारला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली, तसेच तारेच्या कुंपणात वीजप्रवाह कसा उतरला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!