न्यायालयाने सुनावली तब्बल १३५ वर्षांची शिक्षा, भावाने बहिणीवर केलेला बलात्कार..


केरळ : केरळमध्ये सध्या एका प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची चर्चा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी आपल्या अल्पवयीन चुलत बहीणीवर वारंवार बलात्कार करून गर्भधारणा केल्याप्रकरणी केरळ न्यायालयाने सोमवारी एका व्यक्तीला एकूण १३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

यामुळे देशात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या व्यक्तीने चुलत बहिणीवर अनेकवेळा बलात्कार केला आणि तिला गरोदरही ठेवल्याचा त्या व्यक्तीवरचा आरोप सिद्ध झाला आहे.

या प्रकरणात त्या व्यक्तीला एकूण १३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पीडितेने मुलाला जन्म दिल्याचे वकिलाने सांगितले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश साजी कुमार यांनी २४ वर्षीय तरुणाला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बाल न्याय कायदा या कायद्यांतर्गत दोषी ठरवून वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या आहेत.

सर्व प्रकरणांमध्ये, दोषीला एकूण १३५ वर्षांची शिक्षा झाली आहे. तसेच, सर्व शिक्षा एकाचवेळी चालतील असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

न्यायालयाने दोषीला ५.१ लाखाचा दंडही ठोठावला आहे. तर घटनेच्या वेळी १५ वर्षांचे असलेल्या अल्पवयीन पीडिताला ४ लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!