मणिपूर पुन्हा पेटले, महिला मंत्र्याच्या घराला लावली आग, राज्यात मृत्यूचा आकडा १०० वर..


मणिपूर : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा मोठा गोंधळ सुरू आहे. येथील पश्चिम इंफाळ जिल्ह्यात लाम्फेल परिसरात मणिपुरच्या महिला मंत्री नेमचा किपगेन यांच्या घराला समाजकंटकांनी आग लावली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. लष्काराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
नेमचा किपगेन यांच्या घराला आग लावली, त्यावेळी त्यांच्या घरी कुणी नसल्याने अनर्थ टळला. मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल व प्रशासन यंत्रणा घटनास्थळी पोहचली आहे. या घटनेची जबाबदारी अद्याप कुठल्याही घटकाने घेतलेली नाही. किपगेन या कुकी समाजाच्या नेत्या आहेत. त्यांना अनेक दिवसांपासून धमक्या येत होत्या.

मणिपुरात मेइती आमि कुकी समाजातील काही जणांमध्ये झालेल्या वादामुळे हिंसाचार झाला. यात अद्यापपर्यंच शंभरहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. यामुळे याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री खमेन्लोकमध्ये बिगर आदिवासी आणि आदिवासी गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ११ लोकांचा मृत्यू झाला. तसेच अनेकजण बेपत्ता झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!