जेजुरीत गावच्या एकजुटीचा झाला विजय, १३ दिवसांनंतर देवस्थानाबाबत झाला मोठा निर्णय…

जेजुरी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त निवडीविरोधात जेजुरीत आंदोलन सुरू आहे. गेल्या १३ दिवस सर्वपक्षीय ग्रामस्थांचे आंदोलन चालू होते.

याबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता आज झालेल्या धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदी जेजुरीतील ६ ग्रामस्थ आणि बाहेरच्या ५ जणांची नियुक्ती होणार आहे.
देशात पुन्हा उडाली खळबळ! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करत मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, आणि

धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वस्त मंडळात स्थानिकांना डावलण्यात आल्याने स्थानिक खांदेकरी आणि नामकरी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना स्थानिकांची आहे.
त्यासाठी जेजुरीकरांनी आंदोलन पुकारलं होतं. याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून स्थानिकांना न्याय देण्याची ग्वाही त्यांना राज ठाकरेंनी दिली होती.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल; जाणून घ्या..
धर्मादाय आयुक्तांकडे या संपुर्ण प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. त्यानंतर यावर असा निर्णय घेण्यात आला की, आता एकूण विश्वस्तांपैकी ६ जण जेजुरी गावचे तर इतर ५ जण हे जेजुरी बाहेरचे असणार आहेत.
यामुळे या निर्णयानंतर जेजरीकरांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंद व्यक्त केला आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.