राहुल गांधी यांच्या यात्रेतून पोलीस गायब ,थांबवलेली पदयात्रा पुन्हा सुरु, नेमकं झालं काय?

जम्मु काश्मीर : सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. असे असताना सुरक्षेच्या कारणास्तव कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वत: पुरती भारत जोडो यात्रेत चालणे थांबवले होते. यामुळे याची चर्चा सध्या सुरू होती.

असे असताना सुरक्षा पुन्हा वाढवून आज सकाळी पुन्हा राहुल गांधींनी आपली पदयात्रा सुरु केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आपल्या मुलीसह राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या राहुल गांधी हे काश्मीरमध्ये आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यासोबत अनेक लोक यात्रेत चालत होते. पण अचानक पोलीस सुरक्षा व्यवस्था ठप्प झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी यांनी ही यात्रेत चालणे थांबवले होते.

यामुळे अनेक तर्कवितर्क सांगितले जात होते. नंतर याबाबत कारण समोर आले. जम्मू-काश्मीर पोलिसांकडे राहुल गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती.