कर्नाटकनंतर मध्य प्रदेशात देखील भाजपला धक्का? भाजपचे टेन्शन वाढवणारा सर्व्हे आला समोर…


भोपाळ : कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. असे असताना आता मध्य प्रदेशातही काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा दावा करण्यात आला आहे.

यामुळे याची चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशात निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक सर्वे समोर आला आहे. या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपला ५५ पेक्षा कमी जागा मिळणार असल्याचंही सांगितले जात आहे. कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेशात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहे.

या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप काँग्रेस याठिकाणी जोरदार तयारी करत आहेत. मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत.

सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे. यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!