गोपीचंद पडळकर नको तेच बोलले, शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घरसली..


सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहेमी जोरदार टीका करतात. आता गोपीचंद पडळकर यांनी पवारांचा एकेरी उल्लेख करत अरे तुरेची भाषा वापरली आहे.

यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पडळकर म्हणाले, शरद पवार यांना मस्ती आलीय, असं ओपीचंद पडळकर एकेरी उल्लेख करताना म्हणाले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे.

दरम्यान, ते म्हणाले जेजुरी देवस्थानामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थान आणि पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी संस्थान ही होळकरांची जहागिरदारी आहे.

गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्यावर आणि संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांवर टीका करत असतात. गोपीचंद पडळकर हे सोलापुरातील मंद्रूप येथील धनगर समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!