काय सांगताsss! IAS तुकाराम मुंढे यांच्या घरी दरोडा? नावातील साधर्म्यामुळे उडाला मोठा गोंधळ; सत्य वाचून थक्क व्हाल!

मुंबई : महाराष्ट्रातील डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या घरी दरोडा पडल्याची बातमी समोर आल्याने सोशल मीडिया आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पसरली. मात्र, पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. नावातील साधर्म्यामुळे हा संपूर्ण गैरसमज निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.
नेमकं काय घडलं दिवा शहरात?


ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरातील आगासनगाव परिसरात राहणारे स्थानिक उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांच्या बंगल्यात मंगळवारी (17 नोव्हेंबर 2026) पहाटेच्या सुमारास चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली.

नावातील साधर्म्यामुळे उडाला गोंधळ

घरमालकाचे नाव तुकाराम मुंडे असल्याने ही बातमी वेगाने पसरली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या घरीच दरोडा पडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. त्यामुळे अनेकांना या घटनेबाबत संभ्रम निर्माण झाला.
पोलिसांच्या तपासात सत्य उघड
या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान हा प्रकार IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या घरी नव्हे, तर दिव्यातील स्थानिक उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांच्या बंगल्यात घडल्याचे स्पष्ट झाले. केवळ नावातील साधर्म्यामुळे हा गैरसमज पसरला होता.
एक संशयित पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणाचा तपास सुरू असून मुंब्रा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून चोरीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत.
