मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ४९ लाखांचा निधी सुपूर्द; आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी उपक्रम


दौंड : दौंड तालुक्याचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार राहुल दादा कुल मित्र मंडळ’ यांच्यावतीने दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’कडे ₹४९,००,००० (एकोणपन्नास लाख रुपये) इतक्या देणगीचे धनादेश जमा करण्यात आले.

आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त बांधवांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर हितचिंतक, नागरिकांनी, समाजबांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे या सामाजिक उपक्रमातून एकूण ₹४९ लाखांची रक्कम जमा होऊ शकली.

या सर्व धनादेश आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या देणगीचा वापर दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मार्फत केला जाईल.

आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात सहभागी होऊन दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे व कार्यकर्त्यांचे ‘आमदार राहुल दादा कुल मित्र मंडळ’ यांच्यावतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे. संकटकाळी समाजातील नागरिकांनी एकमेकांना साथ दिल्याने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

संकटाच्या काळात बळीराजा आणि दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी धावून जाणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. माझ्या एका आवाहनाला प्रतिसाद देत मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी जो विश्वास व आपुलकी दाखवली, त्याबद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.
— आमदार राहुल कुल

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!